नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचाराबाबत तात्काळ चर्चा घ्यावी, यासाठी विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज सलग पाचव्या दिवशी राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. सदनाचे कामकाज आता होळीनंतर ११ मार्चला नियोजित करण्यात आले आहे.

आज सकाळी सदनाचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केली. त्यांची नावे घेऊन त्यांचे वर्तन असंसदीय असल्याचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. मात्र गदरोळ सुरुच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.