नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्त्रियांचा आदर करण्याचा, सन्मान राखण्यासाठी आणि सामाजिक विकासातील त्यांच्या योगदानाची जाण ठेवण्याची परंपरा देशाला असल्याचे राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ८ मार्चला साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ते आज राज्यसभेत बोलत होते.

आर्थिक आणि सार्वजनिक क्षेत्रात महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात जगभरातल्या महिलांचे यश साजरे करण्यासाठी समानता, न्याय आणि आर्थिक विकास साध्य करण्यासाठीच्या त्यांच्या अथक प्रयत्नांबाबत आदर व्यक्त करण्यासाठी महिला दिवस असल्याचे नायडू यांनी सांगितले.