नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया विभागातल्या ३०१ कोटी रुपयांच्या १० प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे दहा हजार लोकांना रोजगार मिळणार असून त्याचा फायदा ४० हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

नवी दिल्ली इथे काल झालेल्या आंतरमंत्रालयीन मंजुरी समितीच्या बैठकीत ही मंजूरी देण्यात आली. अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरासिमरत कौर बादल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

सरकार व्यापारातल्या गुंतवणूकीला प्रोत्सहन देत असून गेल्या १५  दिवसात सुमारे ७०७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आल्याचे बादल यांनी सांगितले.