नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातून २०२०च्या डिसेंबर महिन्यात वस्तु आणि सेवा कराअंतर्गत १ लाख १५ हजार १७४ कोटी रुपयांचा महसुल गोळा झाला. याआधी २०१९ च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या संकलानाच्या तुलनेत हे प्रमाण १२ टक्क्यानं जास्त आहे.

देशभरात वस्तु आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर हे आजवरचं एका महिन्यातलं सर्वाधिक संकलन असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. याशिवाय मागच्या २१ महिन्यांमधली ही सर्वाधिक वाढ असल्याचंही मंत्रालयानं नमूद केलं आहे.

कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्था वेगानं रुळावर आणावी यासाठी केलेले प्रयत्न, खोट्या देयकांविरोधोत सुरु केलेली मोहीम, आणि व्यवस्थेमधे केलेले बदल यामुळे वस्तु आणि सेवा कर संकलनात वाढ झाल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.