मुंबई (वृत्तसंस्था) : बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी घेतलेला मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय लाभदायक ठरला असल्याचं, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१९ च्या तुलनेत दस्तनोंदणीत ४८ टक्के तर राज्याच्या महसुलात ३६७ कोटी रुपयांनी वाढ झाली.

त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने तसंच उद्योगक्षेत्राने गती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. घर खरेदी करणाऱ्यांसाठीही हा निर्णय फायदेशीर असल्याचं थोरात म्हणाले.