नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजच्या स्टार्ट अप कंपन्या या भविष्यातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ओडिशामधल्या संबळपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था – आयआयएमच्या कायमस्वरुपी कॅम्पसची पायाभरणी पंतप्रधानांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. शेती क्षेत्रापासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंत स्टार्ट अप्सची व्याप्ती वाढत असून, देशातल्या बहुतांशी शहरामंध्ये आता स्टार्टअप्स येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

२०१४ पर्यंत देशात १४ व्यवस्थापन संस्था होत्या, त्यांची संख्या आता २० झाली असल्याचं ते म्हणाले. या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आलेले विद्यार्थी आत्मनिर्भर भारताच्या अभियानाला बळकटी देतील, असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.