नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातली लसीकरण मोहीम निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच राबवली जाणार असून बूथ पातळीपर्यंत नियोजन करण्यात आलं आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी आज सकाळी सांगितलं.
यासाठी आतापर्यंत ७१९ जिल्ह्यांमधल्या ५७ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे, तसंच ९६ हजार लसीकरण कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित करण्यात आलं आहे. लसीकरण केंद्रात प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन स्वतंत्र कक्ष असतील, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.