नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनसामान्यांचा विकास साधून त्यांचं कल्याण करण्याच्या दिशेनं विज्ञान क्षेत्रात कार्य व्हायला हवं, असं आग्रही प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
विज्ञान क्षेत्रात महिला’ ही या वर्षीच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे. त्याविषयी बोलताना राष्ट्रपती म्हणाले, की विज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी देशातल्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं त्यांनी केंद्रीय विद्यापीठांमधे महिलांचं प्रतिनिधीत्व वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
विविध क्षेत्रात उद्भवणा-या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी देशभरातल्या शास्रज्ञांनी एकत्र येऊन सरकारला मदत करावी, असं आवाहन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं.