मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार १६० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख ५० हजार १७१ झाली आहे.

काल ६४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार सातशे ५९ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५५ शतांश टक्के इतका कायम आहे.

काल दोन हजार ८२८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख ५० हजार एकशे ८९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ८७ शतांश टक्के इतका आहे.

सध्या राज्यात ४९ हजार ६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.मराठवाड्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २३८ रुग्णांची नोंद झाली. मृत रुग्णांमध्ये बीड जिल्ह्यातल्या ३, जालना, नांदेड, तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे ६० कोविडग्रस्त आढळले, नांदेड जिल्ह्यात ५९, लातूर ५४, बीड ३०, जालना २६, परभणी ६, तर हिंगोली जिल्ह्यात काल ३ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली.