नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी निमंत्रण सुद्धा स्वीकारलं होतं. “बोरिस जॉन्सन यांनी काल सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली.
महिनाअखेरीस भारत दौऱ्यावर उपस्थित राहता येणार नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली”. कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत असल्यामुळे काल रात्री ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
जवळपास पाच कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये परतणार असल्याचं पंतप्रधान जॉन्सन यांनी सांगितलं. ब्रिटन मधल्या या नव्या टाळेबंदीची सुरुवात शाळांपासून होणार आहे.
आजपासून तिथल्या सर्व शाळा बंद होतील अशी माहिती जॉन्सन यांनी काल जनतेला संबोधित करताना दिली.