भोसरी : संपुर्ण महाराष्टाचे लाडके व आदरासपाञ असलेले कविवर्य श्री. मधु मंगेश कर्णिक यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वतीने दर दोन वर्षांनी प्रदान करण्यात येत असलेला “जनस्थान पुरस्कार २०२०” नुकताच जाहीर झाला आहे. या पुरस्कारामध्ये एक लाख रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
त्यांच्या निवडीबद्दल काव्य व साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. त्यांचे काव्य, साहित्य क्षेत्रातील योगादानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नक्षत्राचं देणं काव्यमंच, शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने आयोजित केलेल्या पाचव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१८ चे महाकाव्य संमेलनाध्यक्ष म्हणून सलग दोन दिवस उपस्थित होते.
काव्यमंचवर त्यांचे प्रेम आहे. काव्यमंचच्या कार्याचे त्यांनी कौतुक ही केलेले आहे. नक्षञाचं देणं काव्यमंचवतीने राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क करुन या पुरस्कार निवडीबद्दल अभिनंदन केले. कविवर्य मधु मंगेश कर्णिक यांचे विपुल साहित्य लेखन आहे. मधुभाई या टोपणनावाने त्यांची ओळख आहे. त्यांनी कांदबरी, कथा, प्रवासवर्णन, व्यक्तीचिञण, ललितलेखन, आत्मचिरिञ, काव्यलेखन, बालकथा, संग्रह, नाटक इ.विविध प्रकारचे लेखन करुन मराठी भाषेला समृध्द केले आहे.
त्यांनी दूरदर्शन मालिका लेखन केले आहे. त्यात जुईली, भाकरी आणि फूल, राजामाणूस, सांगाती इ. होय. करुळचा मुलगा हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यांचे प्रकाशित साहित्य अबीर गुलाल (व्यक्तीचिञे), आधुनिक मराठी काव्यसंपदा (संपादीत लेख), त्यांचे पुढील कथासंग्रह प्रकाशित आहेत. त्यात कॅलिफोर्नियात कोकण, कमळण, काळवीट, काळे कातळ, तांबडी माती, केवडा, कोकणी गं वस्ती, कोवळा सूर्य, गावकडच्या गजाली, चटक चांदणी, झुंबर, तहान, तोरण, दरवळ, दाखल, भूईचाफा, भोवरा, मनस्विनी इ. होय.
कांदबरी लेखन पुढील प्रमाणे केले आहे. त्यात कातळ, जुईली, तारकर्ली, देवकी, निरभ्र, पांघरुण, भाकरी आणि फूल, माहीमची खाडी, राजा थिबा, वारुळ, संधिकाल, सनद/सूर्यफूल इ. होय. तसेच केला तुका झाला माका (नाटक), गावठाण (ललितलेखसंग्रह), जगननाथ आणि कंपनी (बालकथासंग्रह), जिवा भावाचा गोवा (ललितलेखसंग्रह), जैतापूरची बत्ती (वैचारिक), दशावतारी मालवणी मुलूख (स्थलवर्णन), दूत पर्जन्याचा (चरित्र), नारळपाणी (पर्यटन), नैर्ञत्येकडील वाटा (ललित लेखसंग्रह), मातीचा वास (वेचक लेखन), मुलूख (ललित लेखसंग्रह), लागेबांधे (व्यक्तिचित्र), शब्दांनो मागुते व्हा (काव्य), शाळे बाहेरील सवंगडी (बालकथासंग्रह), सोबत (काव्यात्मक गद्य), स्मृतिजागर (वेचक लेखन), ह्रदयंगम (वेचक लेखन), सृष्टी आणि दृष्टी (व्यक्तिचिञण) इ. लेखन करुन शारदेची प्रामाणिक पूजा केलेले उपासक आहेत.
त्यांना राज्य पुरस्कार सन्मानाने गौरविण्यात आले आहे. पद्मश्री या पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे. पाठ्यपुस्तकांसाठी निवडले गेलेले लेख आहेत. अनेक संमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत. ६४ व्या संमेलनाचे अध्यक्ष राहीलेले आहे. या वयातील त्यांचे लेखन चालूच आहे. विविध कार्यक्रमांना ही उपस्थित राहुन मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या महान कार्याला साहित्यिकांनातर्फे आभाळभरुन शुभेच्छा..!