पुणे : कोविड लसीकरणाचा शुभारंभ मुळशी तालुक्यातील माले प्राथमिक आरोग्य केंद्र व लवळे येथील सिम्बॉयसिस हॉस्पीटल येथे करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी लवळे येथील केंद्राला भेट दिली.
सिम्बॉयसिस हॉस्पीटल येथे सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस.बी.मुजुमदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लसीकरणाची सुरुवात सिम्बॉयसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय नटराजन यांनी लस घेऊन केली. तसेच मुळशी तालुक्यातील माले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. माले व लवळे येथे 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे
सिम्बॉयसिस येथील लसीकरण केंद्रास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट दिली. लसीकरणाची पाहणी करत लसीकरण केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी त्यांनी बातचीत केली. यावेळी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण, उपसंचालक संजय देशमुख, डॉ. बावीस्कर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी अजित कारंजकर उपस्थित होते.