नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अत्यंत कमी वेळेत कोविड लस तयार होणं, हे भारताचं ज्ञान आणि वैज्ञानिक प्रगल्भतेचं उदाहरण असल्याचं प्रतिपादन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत कालपासून प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. कोविड लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असून, लस घेतल्यानंतरही कोविड प्रतिबंधाचे नियम पाळावे लागतील, असं प्रधानमंत्रींनी नमूद केलं. ‘दवाई भी – कडाई भी’ असा नारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, देशात नवउद्योगांना चालना देण्यासाठी प्रधानमंत्रींनी काल एक हजार कोटी रुपये निधीची घोषणा केली. प्रारंभ या स्टार्टअप इंडिया जागतिक परिषदेत ते काल बोलत होते.