नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विविध भागातून केवडियापर्यंत जाणाऱ्या 8 रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीयांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे केवडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.

याच कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते गुजरातमधील रेल्वेच्या इतर अनेक प्रकल्पांचंही उद्घाटन होणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजयरुपाणी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल हेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.