मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील अपघात प्रवण जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईत राज्य रस्ता सुरक्षा परिषद तसंच परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या, ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते.

सध्या महाराष्ट्र रस्ते अपघातात दुसऱ्या क्रमांकावर आहे, या यादीत महाराष्ट्राचं नाव राहू नये, महाराष्ट्र अपघातमुक्त व्हावा, असा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. औरंगाबाद जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवल्यानं, जिल्ह्यात रस्ते अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे.

याबद्दल औरंगाबाद जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.