नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट या २०२१ मध्ये होत असलेल्या प्रवेश परीक्षांसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल केलेला नाही असे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
याशिवाय २०२१ मध्ये या परीक्षा देत असलेल्या उमेदवारांना उत्तरासाठीचे पर्यायही उपलब्ध असतील असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यानुसार विद्यार्थ्यांना ९० पैकी ७५ प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील असं या संदर्भात मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
२०२१ होणाऱ्या नीट या परीक्षेचं स्वरुप नेमकं कसं असेल, हे अजून जाहीर झालेलं नाही. मात्र देशातल्या काही शिक्षणमंडळांना अभ्यासक्रमात कपात केल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्रालयानं यासंदर्भातलं निवेदन जारी केलं आहे.