नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांसाठी आणि आवश्यक सेवेसाठी ११२ नंबरची नवी यंत्रणा संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केलं आहे.ते वर्धा इथं पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.

या ११२ नंबरच्या यंत्रणेमध्ये महिलांची छेडखाणी,अपघात यासंदर्भात आवश्यक सेवा असेल,त्यासाठी २ हजार ५०० चारचाकी गाडी,२ हजार दुचाकी गाड्या घेण्यात येणार असून या गाड्यांना आणि त्यांना जी पी एस नंबर जोडण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

प्रत्येक जिल्ह्यात यावर काम सुरू असून राज्य शासनाने १२ हजार ५०० पोलिस भरतीचा निर्णय घेतलेला होता.त्या संदर्भात ५ हजार ३०० पोलिस भरतीची प्रक्रिया पहिल्या टप्प्यात सुरू केलेली असल्याचेही ते म्हणाले.