नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आज आसाममध्ये गुवाहाटी येथे केंद्रिय सशस्त्र पोलिस दलासाठी आयुषमान भारत योजनेचा प्रारंभ करणार आहेत. केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्री आज शिलाँगमधे होणाऱ्या ईशान्य क्षेत्र परिषदेच्या ६९ व्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय तिथल्या विकासाच्या योजनांबाबतचं सादरीकरण करणार आहे. केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंग, ईशान्येकडील आठ राज्यांचे मुख्यमंत्री तसंच वरीष्ठ सरकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील.