पुणे : भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानात शासकीय ध्वजारोहण झाले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक एस चोक्कलिंगम, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, मुख्यमंत्री महोदयांचे आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी पोलीस पथकाने ध्वजास सलामी दिली. यावेळी वीरमाता व वीरपत्नींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
दरम्यान राज्य शासनाच्या वतीने पोलीस विभागाला देण्यात येणारी वाहने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस विभागाला सुपूर्द करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थींचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अभिनंदन केले. तसेच ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर पत्नी, ज्येष्ठ नागरिक, वरिष्ठ अधिकारी, पत्रकार, कर्मचारी, विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.