The Prime Minister, Shri Narendra Modi virtually inaugurates the Bengaluru Tech Summit, in New Delhi on November 19, 2020.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. दूरदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमधले नेते सहभागी झाले होते. कृषी सुधारणा विधेयकांवर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं  संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं.

मोठ्य पक्षांनी चर्चेमध्ये सहकार्य करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. छोट्या पक्षांना चर्चेत जास्त वेळ देण्याची सूचनाही त्यांनी केली. शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारून पुढची चर्चा करावी, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केल्याचं जोशी म्हणाले.

नेहमी अधिवेशनापूर्वी होणारी  ही बैठक यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर आयोजित करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज ५-५ तासाच्या सत्रामध्ये विभागण्यात आलं आहे. राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात तर लोकसभेचं कामकाज दुपारच्या सत्रात होणार आहे.