मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात महिला पोलिसांचे दररोजचे कामाचे तास कमी करुन ८ तासांची पाळी करण्यात आली आहे. महिला, आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली. महिला कर्मचाऱ्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागतात म्हणून त्यांना १२ तासांऐवजी ८ तासांची पाळी देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. हा निर्णय २७५ शहरी आणि ४२७ ग्रामीण पालीस ठाण्यांमधे लागू होणार असून ७०२ महिला कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.