मुंबई (वृत्तसंस्था) : पूर्वअनुमानुसार संपूर्ण राज्यात कालपासून सगळीकडे पाऊस पडला, तर एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाऊस झाला. येत्या दोन दिवसात कोकण, महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात एक दोन ठिकाणी मुसळधार तर इतरत्र पावसाची शक्यता आहे. हवेत वरच्या बाजूला चक्रीय पट्टा आणि खालच्या स्तरावर नैऋत्य वारे वाहत असल्याच्या एकत्रित प्रभावामुळे हा पाऊस होत असल्याचं मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक शुभांगी भुते यांनी सांगितलं. येत्या २४ ते २५ तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात सर्वत्र पुन्हा पाऊस होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.