मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनावरची लस घेतली तरी जोपर्यंत कोरोनाचं समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत काळजी घ्यावीच लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल दैनिक सकाळच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.
कुठलंही ठोस औषध उपलब्ध नसताना कोरोनावर नियंत्रण मिळवणं मोठ दिव्य होतं, मात्र सर्व कोविड योद्ध्यांच्या सहकार्यानं आपण तेही करून दाखवलं. अनेक कोविड योद्धधे, सामाजिक संस्थांनी उत्तम कामगिरी बजावली.
धारावी पॅटर्नसोबतच इतर उपाययोजनांचं जगभर कौतुक झालं. पण धोका अजून टळलेला नाही, जाणकारांच्या मते इंग्लंडमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन संपूर्ण मानवजातीसाठी धोका आहे. त्यामुळे ते दिवस पुन्हा येऊ नयेत यासाठी मास्क घालणं, हात स्वच्छ धूत राहणं अशी काळजी घेत राहावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.