मुंबई: ट्रेड इंडिया हा देशातील अग्रगण्य बीटूबी ऑनलाइन मंच इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग व मशीनरी एक्स्पो इंडिया २०२१ या व्हर्चुअल इव्हेंटचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. यात नव्या युगातील एआय, व्हॉइस ऑटोमेशन, देशातील डिजिटल बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी २.० मधील पुढील कथा लिहिण्याकरिता ऑगमंटेड व व्हर्चुअल रिअॅलिटी यांसारख्या असंख्य तंत्रज्ञान आविष्कारांचा समावेश असेल. ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान आयोजित या कार्यक्रमात कृषी यंत्र व साधने, वेल्डिंग इलेक्ट्रोड्स, सीएनसी मशीन्स, बेकरी उपकरणे, डेअरी उपकरणे, सर्जिकल उपकरणे इत्यादी क्षेत्रासंबंधी विविध भागांतून प्रदर्शन भरवले जाईल.

इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग व मशीनरी एक्सपो इंडिया २०२१ हा अनेक विविध क्षेत्रातील ट्रेडर्स, ग्राहक, निर्माते, मीडिया हाऊस, सेवा प्रदाते, ई कॉमर्स सेलर्स व एक्सपोर्टर्सना मदत करतील. भारत तसेच जगातील संभाव्य खरेदीदार व विक्रेत्यांशी याद्वारे डिजिटली कनेक्ट केले जाऊ शकते. ट्रेड इंडिया या महत्त्वाच्या डिजिटल ट्रेड परिषदेमार्फत, व्यवसायांना अनेक प्रकारे भागीदारी करण्यासाठी मदत करेल. तसेच योग्य पुढाकार घेईल, वेगवान उद्योगासाठी वळणे व अडथळा विरहित वितरण प्रणाली व पुरवठा साखळी चॅनल्स तयार करेल. द इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग व मशीनरी एक्सपो इंडिया २०२१ मध्ये पंप व पंपिंग उपकरणे, नट्स, बोल्ट्स, फस्टनर्स, ब्राइट बार्स, मशीन पार्ट्स, पेपर कन्व्हर्टिंग मशीन्स, ऑटोक्लेव्ह्ज, स्टरलायझर्स, हॉटेल युनिफॉर्म्स आदी इंजिनिअरिंग व मशीनरी उत्पदनांची मोठी श्रेणी आहे.

ट्रेंड इंडिया डॉटकॉमचे सीओओ श्री संदीप छेत्री म्हणाले, “ट्रेड इंडियाने इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग व मशीनरी एक्सपो २०२१ या सलग सहाव्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आम्हाला खात्री आहे की, खरेदीदार व विक्रेते यांच्यातील डिजिटल सहभागाने औद्योगिक इंजिनिअरिंग व मशीनरी सेगमेंटमध्ये याद्वारे निश्चितच विकास घडून येईल. असंख्य व्हिजिटर्स, सहभागी व संयोजकांदरम्यान अखंड व अर्थपूर्ण संवाद होईल.”