मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवता यावं, यासाठी केंद्र सरकार एक विशेष पथक पाठवणार आहे. असंच एक पथक केरळातही पाठवलं जाणार आहे. देशभरात सर्वत्रच कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असतानाही, महाराष्ट्र आणि केरळातल्या रुग्णसंख्येचं प्रमाण कमी झालेलं नाही. त्यामुळे केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला. सध्या देशभरात उपचार घेत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी सुमारे ७० टक्के रुग्ण महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमधे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्यात येत असेल्या पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण केंद्र आणि नवी दिल्लीतल्या डॉक्टर आरएमएल रुग्णालयातल्या तज्ञांचा समावेश असेल.

दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हा निर्णय कोविड१९ वर नियंत्रण मिळवण्यातल्या व्यवस्थापनातला एक भाग असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.