नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे ठेवायच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं बँकिंग क्षेत्रातल्या तज्ञांनी स्वागत केलं आहे.

देशाचा विकासदर जोपर्यंत पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत, बँकेनं अशाच पद्धतीनं सर्वांना सामावून घेण्याचं आर्थिक धोरण कायम ठेवायला हवं अशी अपेक्षा बंधन बँकेचे मुख्य अर्थतज्ञ आणि संशोधन प्रमुख सिद्धार्थ सान्याल यांनी व्यक्त केलं आहे.

सरकारला वाढीव कर्ज मिळवताना कोणताही परिस्थितीजन्य अडथळा निर्माण होऊ नये याची खबरदारीही रिझर्व्ह बँकेनं घेतली असल्याचं सान्याल यांनी म्हटलं आहे.