नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय हा सामना होणार आहे.कोरोना साथीमुळे भारताचे जवळपास वर्षभराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होत असून या आधी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकाता इथल्या इडन गार्डन मैदानावर कसोटी सामना झाला होता. आय सी सी च्या जागतिक कसोटी सामन्यांच्या स्पर्धेतली अखेरची मालिका असणार आहे.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने या आधीच स्थान पटकावले आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातला कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करतो याबाबत उत्सुकता आहे.

भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नई इथं सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या दोन बाद ८१ धावा झाल्या होत्या. जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला.