नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेला सुदृढ बनवण्यासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकारनं मिळून काम करावं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते.

देशातल्या नागरीकांच्या अधिकारांची सुरक्षा असो, किंवा राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणं असो, न्यायव्यवस्थेनं नेहमी आपलं कर्तव्य बजावलं असल्याचं ते म्हणाले. न्यायव्यवस्थेत केल्या जाणाऱ्या विविध सुधारणांमुळे न्यायालयांचं कामकाजही आधुनिक झालं असल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी, कोविड काळात सर्वोच्च न्यायालय, तसंच जिल्हा न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल माध्यमातून सुनावणी झाल्याचं नमूद केलं.