पुणे (वृत्तसंस्था) : भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा पी एफ खात्यातून आगाऊ रक्कम काढता येणार असल्याचं म्हटलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये आर्थिक गरजा भागविण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे.

तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याएवढी रक्कम किंवा पी एफ खात्यामध्ये असलेल्या रकमेपैकी ७५ टक्के रक्कम; अग्रिम रक्कम म्हणून काढता येणार असल्याची माहिती भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे पुणे विभागाचे आयुक्त अरुणकुमार यांनी दिली आहे.

यासाठी आधारकार्ड पीएफ खात्याशी लिंक करणे बंधनकारक असून कर्मचाऱ्यांचे पी एफ खाते त्यांच्या आधारकार्ड नंबरशी लिंक करणे तसंच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेणं कंपनी मालकांस बंधनकारक राहणार आहे.