नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या २२ देशांनी भारताकडे कोरोना प्रतिबंधक लसींची मागणी केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. भारतानं आतापर्यंत १५ देशांना लस पुरवठा केला आहे.
दोन फेब्रुवारीपर्यंत लसीच्या ५६ लाख मात्रा मदत म्हणून, तर १०५ लाख मात्रा करारान्वये दिल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली.दरम्यान, लसीकरण मोहिमेदरम्यान भारतानं सर्वाधिक वेगानं ५० लाख मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत देशात ५२ लाख ९० हजार ४७४ जणांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी दिली.