मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ९२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं  प्रमाण ९५ पूर्णांक ७२ शतांश टक्के झालं आहे. काल २ हजार ७६८ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या २० लाख ४१ हजार ३९८ झाली आहे.

सध्या राज्यात ३४ हजार ९३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल २५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार २८० झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २ पूर्णांक ५१ शतांश टक्के झाला आहे.

ठाणे  जिल्ह्यात कोरोनाचे २७५ रुग्ण काल आढळले. जिल्ह्यात आता दोन लाख ५५ हजार ४८४ रुग्णांची नोंद झाली. काल सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार १८० झाली आहे. अंबरनाथमध्ये तीन रुग्ण आढळले इथ बाधीत आठ हजार ६१३ आहेत. बदलापूरमध्ये १४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ४१७ झाले आहेत.

परभणी जिल्ह्यात काल २ तर आतापर्यंत ७ हजार ६२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ९ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्ण संख्या ७ हजार ९९० झाली आहे. सध्या ४९ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाशीम जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ९३६ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे जिल्ह्यातली रुग्णांची एकूण संख्या सात हजार २२३ झाली आहे सध्या जिल्ह्यात १३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात या आजारानं १५५ रुग्णांचा बळी घेतला आहे.

नांदेड जिल्ह्यात काल २७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ५८४ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल बारा नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्ण संख्या वाढून २२ हजार ६३४ झाली आहे. सध्या २५९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ५८७ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात काल ४७ तर आतापर्यंत १३ हजार ७३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल ६१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, रुग्णांचा आकडा १४ हजार २४७ वर पोचला आहे. सध्या जिल्ह्यात ३६७ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यात काल बरे झालेल्या ६० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ५४ हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. काल ४८ नवे रुग्ण आढळल्यामुळे, बाधितांची संख्या ५६ हजार ७९६ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ७४४ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १ हजार ८२७ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.