नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारी टाटा मुंबई मॅरॅथॉन यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ३० मे ला आयोजित करण्यात येणार असल्याचं या मॅरॅथॉनचे पुरस्कर्ते प्रोकॅम इंटरनॅशनलनं जाहीर केलं आहे.
कोविड-१९ साठी आवश्यक ते सर्व सुरक्षिततेचे उपाय आणि खबरदारी यांबाबत राज्य आणि नागरी यंत्रणांशी सविस्तर चर्चा करूनच या स्पर्धेचे नियोजन केल्याची माहिती आयोजकांनी आज मुंबईत जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
TMM २०२१ या अॅप्लिकेशनद्वारे देशातून आणि जगभरातून इच्छुक स्पर्धक आपल्या पूर्वनियोजित स्थळांवरून या मॅरॅथॉनमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.
यासाठीच्या नोंदणी प्रक्रियेची माहिती आयोजकांकडून येत्या काही दिवसांत देण्यात येणार आहे.