नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंडित भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, तो जपला पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ‘स्वरभास्कर’ पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद घेतला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधून गडकरी यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आणि सहभागी कलाकारांचं अभिनंदन केलं. भीमसेन जोशी यांनी आपल्या अजरामर गायनातून, संगीत सेवा केली. या संगीत यज्ञातून पंडीतजींच्या स्मृती जागवून त्यांना आपण अभिवादन केलं, ही चांगली गोष्ट आहे. हा ‘खयाल यज्ञ ‘महोत्सव, रसिकांच्या हुदयात कोरला जाईल, असही गडकरी यावेळी म्हणाले. पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप, उद्या होणार आहे.