नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी शालेय परीक्षांच्या पार्श्वभूमीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत.

यावेळी सहभागी होणाऱ्यांची निवड ऑनलाईन स्पर्धेतून केली जाणार आहे. त्यासाठी येत्या १४ मार्चपर्यंत नोंदणी करता येईल, असं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं. इयत्ता ९ वी ते १२ वी च्य़ा विद्यार्थ्यांना माय गव्ह फॅल्टफॉर्मद्वारे या स्पर्धेत सहभागी होता येईल.

त्यातून सुमारे २ हजार विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची निवड केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. परीक्षायोद्धे त्यांच्या परीक्षेसाठी सज्ज होत असताना परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम परत येतोय असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यावेळी हा कार्यक्रम पूर्णपणे ऑनलाईन असून जगभरातल्या विद्यार्थ्यांसाठी खुला असेल असं ट्विट त्यांनी केलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हसत आणि कसलाही ताण न बाळगता परीक्षांना सामोरं जावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.