मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत टाळेबंदी शिथिल केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना नियंत्रणात असलेला कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या आठवडाभरात पुन्हा वाढताना दिसत आहे.

त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल भायखळा रेल्वेस्थानकातील प्रवासी, उपहारगृह, रेल्वे परिसरातील फेरीवाले आणि दुकानदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन कोरोना नियम पाळण्याचं आवाहन केलं.

भायखळा ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस असा रेल्वे प्रवास करून महापौरांनी प्रवाशांना कोरोनाबाबतच्या त्रिसूत्रीचं महत्व पटवून दिलं.