नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची तिसरी बैठक आज होणार आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टोकियो इथं झालेल्या बैठकीतील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर पुन्हा चर्चा करून त्यांच्या अंमलबजावणीवर यात भर दिला जाणार आहे.

भारत- प्रशांत क्षेत्र  मुक्त आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यात चर्चा होण्याची अपेक्षा आहे. कोविड १९ संकटाशी सामना करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना तसंच हवामान बदला संदर्भातही यावेळी चर्चा होणार आहे.