नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या पार्श्र्वभूमीवर भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल या पेट्या मंगोलियात रवाना करण्यात आल्या.

आतापर्यंत २५ देशांना भारताने कोरोनावरील लसींचा पुरवठा केला असून येत्या काही दिवसात आणखी ४९ देशांना लसी पाठवल्या जाणार असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी जाहीर केलं आहे. युरोप, लॅटिन अमेरिका, आग्नेय आशिया आणि आफ्रिकेतल्या देशांचा यामध्ये समावेश असेल.