A traffic policeman walks in a road on the deserted Durbar Marga in Kathmandu as a lockdown is imposed to contain the coronavirus disease (COVID-19) in Nepal, on March 24, 2020. Photo: Suresh Chaudhary/THT

पुणे (वृत्तसंस्था) : पुणे शहरासह जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काल बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

पुणे पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही काल माहिती दिली. संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तुंची वाहतूककरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. लग्न समारंभासह राजकीय कार्यक्रम घेण्यासाठी आधी पोलिसांची परवनगी घ्यावी लागणार असून, सर्व या कार्यक्रमांसाठी २०० नागरिकांचं बंधन घालण्यात आलं आहे.

राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातही कोरोना संसर्ग वाढत असून अमरावती जिल्ह्यातील अमरावती आणि अचलपूर पालिका क्षेत्रातही आज पासून आठवडाभरासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली तर  इतर अनेक जिल्ह्यात प्रशासनानं निर्बंध कडक केले आहेत.