नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी १७ लाख ४५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं आहे. काल ६ लाख २८ हजारापेक्षा लाभार्थ्यांना लस दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली.
देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक २४ शतांश टक्के झालं आहे. काल १३ हजारापेक्षा जास्त रूग्ण बरे होऊन घरी गेले, १० हजार ५८४ नवे कोरोनाबाधित आढळले. तर ७८ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबळींची संख्या आता १ लाख ५६ हजार ४६३झाली आहे.
देशात आतापर्यंत १ कोटी ७ लाख १२ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशभरात सुमारे १ लाख ४७ हजार अॅक्टीव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.