नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये कोरोना नियमांच्या नावाखाली जनतेच्या नागरी आणि राजकीय हक्कांवर गदा आणली जात असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाच्या प्रमुख मिशेल बॅशलेट यांनी काल केला.
चीनमध्ये सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि काही विदेशी नागरिकांवर चुकीचे आरोप करण्यात येत असून त्यांना बेकायदा ताब्यात ठेवले जात असल्याचे बॅशलेट यांनी मानवाधिकार परिषदेच्या ४६ व्या सत्रात सांगितले.
चीनच्या शिनजिआंग प्रांतात नागरिकांना बेकायदा पद्धतीने ताब्यात ठेवण्याचे आणि लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडत असल्याचा दावाही त्यांनी केला.