महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ” आमचं गाव आमचा विकास ” कार्यक्रमांतर्गत महिला कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे परिपत्रक जारी
पिंपरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने” आमचं गाव आमचा विकास” उपक्रमांच्या अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुलींनी विविध कौशल्ये आत्मसात करून आपले जिवनमान सुधारण्यासाठी उद्योजकतेेकडे वळावे, यासाठी मुली व महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागाकरीता केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या १५ व्या वित्त आयोगातंर्गत तरतुद केलेल्या निधीतून, ग्रामीण भागातील मुली व महिलांना कौशल्यवृदधीसाठी प्रशिक्षण देण्याबाबत सर्व महाराष्ट्रातील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने आदेश देण्यात आले आहे. या अनुषंगाने मे.नॅशनल काॅर्पोरेशन ऑफ इन्फाॅरमेशन टेक्नाॅलाॅजी इंडीया आकुर्डी, पुणे यांच्या महिला व मुलींची गरज व आवड तसेच त्यांना उपयुक्त होतील असे विविध अभ्यासक्रम संस्थेच्या वतीने प्रस्तावित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमातून मुली व महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच कोरोना व्हायरस या संकटकाळात अनेक लोकांनी प्राण गमावले, अनेक जण बाधित झाले, यापासून स्वतांची व कुटुंबियांची काळजी कशी घ्यावी, याकरीता कोव्हीड १९ संबंधित प्रशिक्षण यासंबंधी कोविड १९ संवेदनशीलता आणि जागरूकता प्रशिक्षण, वृद्धांसाठी देखभाल कोविड १९ – संवेदनशीलता आणि जागरूकता प्रशिक्षण, कोविड १९ महिलांनी/मुलींनी स्वतःची व कुटुंबियांची घ्यावयाची काळजी व प्रशिक्षण असे तीन नविन अभ्यासक्रम कोर्सेस या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करण्यात आले आहे . याकरिता महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांनी आपल्या भागातील महिला व मुलींना स्वयंरोजगाराकरीता स्वावलंबी बनवण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आयोजित” आपला गाव आपला विकास” या कार्यक्रमात सहभागी होऊन ” मे.नॅशनल काॅर्पोरेशन ऑफ इन्फाॅरमेशन टेक्नाॅलाॅजी इंडीया आकुर्डी या संस्थेच्या माध्यमातून आपल्या गावातील महिला व मुलींना या प्रशिक्षण योजनेत लाभ घेण्याचे आवाहन करावे. सदर संस्था ही पुणे विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांची विषेश अभ्यासक्रमाकरीता मान्यताप्राप्त संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून ठराविक कालावधीत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार असून भरपुर प्रत्याक्षिक व माहितीच्या हे प्रशिक्षण देण्यात येऊन प्रशिक्षण उत्तीर्ण झालेल्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.