नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि असामान्य व्यक्तीमत्व होते. ऐतिहासिक जीएसटी विधेयकावर राजकीय एकमत घडवून आणण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. उपराष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणतात, “अरुण जेटली हे माझे दीर्घकाळापासून स्नेही होते. त्यांच्या निधनामुळे देशाची तसेच माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि असामान्य व्यक्तीमत्व होते. अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अरुण जेटलींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवण्यात आले होते. ऐतिहासिक जीएसटी विधेयकावर राजकीय एकमत घडवून आणण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. ते अतिशय उत्कृष्टपणे संवाद साधणारे आणि अवघड बाबी सोप्या करुन समजावणारे व्यक्ती होते”.