मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थींचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे.

मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवर अपेक्षेहुन जास्त नागरिकांनी रांगा लावल्या असून गेल्या ३ दिवसांत सुमारे २० हजार जणांचं लसीकरण झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. यामध्ये वरिष्ठ नागरिकांसह ४५ वर्षाहून जास्त वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. या भरघोस प्रतिसादामुळे मुंबईत आणखी १३खाजगी रुग्णालयात लसीकरण केंद्रं सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलातील महानगरपालिकेच्या जम्बो कोविड लसीकरण केंद्रात आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना लस घेतली. मुंबईची महापौर आणि नगरसेविका या नात्यानं कोरोना लसीकरणासाठी जनजागृती करणार आहे.’ अशी प्रतिक्रिया महापौरांनी आकाशवाणीला दिली.