नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड लसीकरणासाठी वेळेची मर्यादा काढून टाकली असून आता दिवसभर म्हणजे चोवीस तासात कधीही लसीकरण करता येणार आहे. यासंदर्भात रुग्णालयांनी विशिष्ट वेळेचा आग्रह न धरता आठवडाभर दिवसरात्र लसीकरण करावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे.
यामुळे लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळता येईल आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करता येईल, असंही ते म्हणाले. हा निर्णय खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही रुग्णालयांना लागू असेल. दरम्यान देशात 16 जानेवारी रोजी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 66 लाखांहून अधिक लोकांनी लस टोचून घेतली आहे.