The Prime Minister, Shri Narendra Modi chairing the meeting of the National Committee on Nation-wide Celebration of 125th Birth Anniversary of the Dr. B.R. Ambedkar, in New Delhi on July 23, 2015.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी स्थापित राष्ट्रीय समितीची पहिली बैठक आज होत आहे. या सोहोळ्यासाठी काय तयारी करायची त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत २५९ सदस्यांची ही समिती दूरदृश्य व्यवस्थेद्वारे चर्चा करणार आहे.

या समितीमध्ये केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल तसंच विविध राजकीय पक्षांचे नेते समाविष्ट आहेत.  तसच कलाकार, खेळाडू, व्यवसाय प्रमुख आणि माध्यमकर्मींचा देखील यात समावेश आहे. आझादी का अमृत महोत्सव या स्वरुपात राष्ट्रीय तंसच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्याचं सरकारनं ठरवलं आहे.

ही समिती धोरणात्मक मार्गदर्शक सूचना तयार करणार आहे. पुढील वर्षी १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या तारखेपूर्वी ७५ आठवडे आधीपासून म्हणजेच या महिन्याच्या १२ तारखेपासून या उत्सवाची सुरुवात होणार आहे. १२ मार्च हा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाचा एक्क्याणवाव्वा वर्धापन दिन आहे.