नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं कामकाज आजपासून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.०० अशा नियमित वेळेत सुरु होत आहे. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या वेळांमध्ये बदल करण्यात आला होता आणि कामकाज मर्यादित वेळेत सुरु होते.

लोकसभेमध्ये आज रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानाच्या मागण्यांबाबत चर्चा आणि गरज पडल्यास मतदान होणार आहे.

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील कायद्यांमध्ये द्वितीय सुधारणा विधेयक मांडलं जाणार असून अनुसूचित जातीविषयीच्या घटनात्मक सुधारणा विधेयकावरही चर्चा अपेक्षित आहे.

राज्यसभेमध्ये आज अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन विधेयक, २०१९ वर चर्चा होणार आहे.