मुंबई (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली नाही, त्यामुळे दोन्ही सभागृह चालू शकली नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शेतकरी आंदोलनाला १०० पेक्षा अधिक दिवस झाले, या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. कृषी कायद्यासंदर्भात शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तशीच संसदही अस्वस्थ आहे, त्यामुळे त्याची प्रतिक्रिया संसदेत उमटली तर चुकीचं ठरणार नाही, असं पवार यांनी नमूद केलं.