मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ३९ शतांश टक्के झालं आहे. काल २ हजार ६८० रुग्ण बरे होऊन घरी गेले, १ हजार ७१५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातल्या मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ९१ हजार ६९७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख १९ हजार ६७८ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३९ हजार ७८९ रुग्ण दगावले. सध्या राज्यात २८ हजार ६३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत काल कोरोनामुळं एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. गेल्यावर्षीच्या २६ मार्च नंतर पहिल्यांदाच ही घटना मुंबईत घडल्याचं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. काल २८ हजारापेक्षा अधिक चाचण्यांनंतर मुंबईत ३६७ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ५१८ जण कोरोनामुक्त झाल्या. सध्या मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के आहे आणि ५ हजार ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.