नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सध्या 43 मार्गांवर 373 किसान रेल्वे सुरु असून , त्याद्वारे 1 लाख 20 हजार टनापेक्षा जास्त शेतमालाची वाहतूक करण्यात येत आहे , अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल राज्यसभेत एका प्रश्रानाच्या  लेखी उत्तरात दिली . देशात किसान रेल शेतकरी आणि कृषी मालाच्या वाहतुकीसाठी क्रांतिकारी ठरली असून, यामुळे नाशवंत कृषी मालाची देशाच्या कोनाकोपऱ्यात वाहतूक करण सुलभ झालं आहे. या किसान रेल्वेगाड्या मुख्यतः, देवळाली , सांगोला , सांगली , डहाणू रोड , नगरसोल , धोराजी, महूवा आदी लहान रेल्वे स्थानकांपासून सुरु होत असून, ती मार्गावरील अनेक लहान स्थानकात थांबतात आणि कृषी माल भरण्यासाठी पुरेसा वेळही देतात अशी माहिती ही गोयल यांनी दिली.