मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वीकेण्डला लॉकडाऊन करण्याच्या विचारात पालिका प्रशासन आहे. गर्दीमुळे कोरोना फोफावला असताना शनिवार-रविवारी किंवा सुट्ट्या जोडून आल्यास लोक फिरायला किंवा पिकनिकला जाण्यासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडतात.

त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आठवडाअखेरीस किंवा सार्वजनिक सुट्ट्यांदिवशी लॉकडाऊन असावा, असे मत पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे.